आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँच झाली दिलीप कुमार यांची बायोग्राफी : \'सब्सटेन्स अँड शॅडो\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत आज एका भव्य सोहळ्यात दिलीप कुमार यांच्या आयुष्यावर आधारित 'सब्सटेन्स अँड शॅडो' ही बायोग्राफी लाँच झाली आहे. पत्रकार आणि लेखिका उदय तारा नायर यांनी लिहिलेल्या या बायोग्राफीत दिलीप साहेबांच्या पत्नी सायरा बानो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून दिलीप कुमार आणि यांच्या कुटुंबीयांशी जवळ असलेल्या उदय तारा नायर आपल्या बुक लाँचच्या निमित्ताने उत्साहित आहेत. चार वर्षे अॅक्टिंग लेजेंडसमोर बसून त्यांची कहाणी ऐखून त्या जेवढ्या इमोशनल आणि नव्हर्स झाल्या, तेवढ्याच त्या आज आहेत. ही आत्मकथा लिहिण्याचा अनुभव त्यांनी आमच्या प्रतिनिधी सलोनी अरोरा यांच्याशी शेअर केला...
नवीन कलाकारांसाठी हे पुस्तक बायबलप्रमाणे असेल?
- होय केवळ कलाकारांसाठीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तींसाठी हे पुस्तक एक ग्रंथ असेल. यामधून दिलीप साहेबां विषयीच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टी जाणून घेता येणार आहेत. मोठे कलाकार असूनदेखील ते विनम्र आहेत.
पुस्तकाच्या निर्मितीविषयी काही सांगा?
-सुरुवातीला मी लिहू शकणार नाही, असे वाटले होते. मी या कुटुंबाला गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखते. पुस्तकाच्या तयारीला आणि चार ओळी लिहायला एक वर्ष लागले. एकुण चार वर्षांच्या काळात हे पुस्तक तयार झाले. पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अशोक चोप्रा यांनी एडिटिंग केली आहे. पुस्तकात एकुण 450 पाने असून त्याची किंमत 699 रुपये आहे.
आपल्या लग्नाविषयी ते मोकळेपणाने बोलले का?
- हा चॅप्टर खूप रोमँटिक आहे. आपल्या लग्नाविषयी बोलताना दिलीप साहेब ब्लश करत होते.
त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे या पुस्तकात मांडण्यात आली आहे?
- त्यांनी आपल्या आयुष्यातील अपयशाविषयीसुद्धा मोकळेपणाने सांगितले आहे. जी स्वप्ने पूर्ण झाली आणि जी नाही झाली, त्या सर्व गोष्टी या पुस्तकात आहेत.