आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप प्रभावळकरांचा ‘जयजयकार’मध्ये नवा विक्रम, 20 फूट उंचीवर केले चित्रीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखन, नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्यांच माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी येत्या 6 जून रोजी प्रदर्शित होणा-या ‘जयजयकार’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी एक नवा विक्रम केला आहे. खोल दरी, विस्तीर्ण व खोल नदीपात्र असा अवतीभवती परिसर असताना 20 फूट उंच विशाल दगडावर जाऊन अत्यंत साहसीपणे दृश्य प्रभावळकर यांनी दिले आहे.
'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटासाठी अत्यंत वेगळ्या आणि सहजासहजी ओळखू न येणा-या मेकअपमध्ये आणि गांधीजींच्या भूमिकेमध्ये जीव ओतून ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात प्रभावळकर यांनी ठसवली होती.
अलीकडेच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'नारबाची वाडी' या चित्रपटात प्रभावळकर यांनी अशीच नारबाची एक विलक्षण भूमिका साकारली होती. आता ‘जयजयकार’ या चित्रपटातही ते वेगळ्या मेकअपमध्ये दिसणार आहेत. विनोदी आणि खेळकर स्वभावाचा ‘अखंड’ या सेवानिवृत्त मेजरची भूमिका ते या चित्रपटात साकारत आहेत. या भूमिकेसाठी एका प्रसंगाकरता त्यांनी 20 फूट उंचीवर दृश्य दिले आहे. या चित्रपटात त्यांची एका तृतीयपंथीयांच्या टोळीशी भेट होते व ते त्यांचे जीवन समजून घेतात असा आशय आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनु रोडे यांनी केले आहे. प्रभावळकर यांच्याबरोबर या चित्रपटात सुहिता थत्ते, संजय कुलकर्णी, भुषण बोरगावकर, धवल पोकळष आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा चित्रपटाशी निगडीत खास छायाचित्रे...