आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16व्या वर्षी \'बॉबी\'मधून घेतली एन्ट्री, आता \'फाइंडिंग फॅनी\'मध्ये बनली रोजी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डिंपल कपाडिया यांच्या 'फाइंडिंग फॅनी' आणि 'बॉबी'ची छायाचित्रे)
मुंबईः आज बॉक्स ऑफिसवर अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइंडिंग फॅनी' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाची कथा याच्या स्क्रिनिंगनंतर उघड झाली आहे. या सिनेमाविषयी चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. अर्जुन आणि दीपिकासह या सिनेमात नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा वेगळा लूक बघायला मिळणार आहे. विशेषतः डिंपल यांनी आपल्या हटके लूकमुळे बरीच चर्चा एकवटली आहे.
'फाइंडिंग फॅनी'मधील डिंपल यांच्या काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला होता. तसे पाहता डिंपल आपल्या बोल्ड इमेजमुळे बॉलिवूडमध्ये नेहमीपासून प्रसिद्ध आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी 'बॉबी' (1973) या सिनेमाद्वारे डिंपल यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पहिल्याच सिनेमात त्यांनी बिकिनी आणि शॉर्ट ड्रेस परिधान करण्याचे धाडस दाखवले होते. त्यानंतर 'सागर', 'जांबाज' या सिनेमातही त्यांचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पडद्यावर बघायला मिळाला. शिवाय सिनेमांमध्ये लिप-लॉक सीन्स देण्यातही त्या मागे नव्हत्या.
डिंपल यांचे किसींग सीन्स...
डिंपल यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत आपले फिल्मी करिअर सुरु केले. त्यानंतर 'सागर' (1985) या सिनेमातसुद्धा त्या ऋषी यांच्यासह झळकल्या. या सिनेमात डिंपल आणि ऋषी यांच्या किसींग सीनची बरीच चर्चा झाली होती. शिवाय याचवर्षी राजीव कपूरसह 'लावा'मध्येही त्यांनी किसींग सीन दिला होता. इतकेच नाही तर 'जांबाज' (1986) या सिनेमात अनिल कपूर आणि डिंपल यांच्यावरदेखील किसींग सीन चित्रीत करण्यात आला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा डिंपल कपाडियांची 'बॉबी'पासून ते आत्तापर्यंतची काही निवडक छायाचित्रे...