आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी जाधवांचा 'टाईमपास'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, आणि ‘बीपी’(बालक पालक), या धमाकेदार सुपरहिट सिनेमांनंतर दिग्दर्शक रवी जाधव प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार याची सगळ्यांनाचा उत्सुकता होती. चला तर मग ही उत्सुकता जास्त ताणून न धरता आम्ही तुम्हाला रवी जाधवांच्या नवीन प्रोजेक्टविषयी सांगतोय. 'बीपी'नंतर आता रवी जाधव प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतायत 'टीपी'. आता 'टीपी'चा अर्थ तरी काय हाच प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे म्हणा. 'टीपी' अर्थातच रवी जाधव आता करणार आहेत 'टाईमपास'. होय 'टाईमपास' हे रवी जाधवांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे.

सिनेमाच्या टायटलवरूनच रवी जाधव आता काहीतरी धमाल करणार हे दिसतंय. या सिनेमातून ते म्युझिकल लव्हस्टोरी हाताळणार आहेत. १६ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांची प्रेमकथा टाईमपासमध्ये साकारण्यात येणार आहे. ही कथा रवी जाधव यांची असून दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा तेच करणार आहेत. तर पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि रवी जाधव या तिघांचे असतील.

या सिनेमातून ‘शाळा’ सिनेमातून लोकप्रिय ठरलेली केतकी माटेगांवकर आणि ‘बीपी’ मधला विशू म्हणजेच प्रथमेश परब हे दोघे या सिनेमात झळकणार आहेत. तर चित्रपटाला चिनार-महेश यांचं संगीत असणार आहे. येत्या मे महिन्यात या सिनेमाचं चित्रीकरण होणार आहे.

एकंदरीतच ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, आणि ‘बीपी’ या दर्जेदार कलाकृती देणा-या रवी जाधवांचा टाईमपास प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी आशा व्यक्त करायला काहीच हरकत नाही.