आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dish On Jacqueline Fernandez In Mumbai Support Casa LA

आता प्लेटमध्ये सजणार 'जॅकलिन सॅलेड', या स्टार्सच्या नावाच्या डिशसुध्दा आहेत प्रसिध्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो: जॅकलिन फर्नांडिस
आवडत्या बॉलिवूड स्टार्सची नावे आपल्या मुलांची नावे ठेवण्याची परंपरा खूप जूनी झाली आहे. परंतु आता रेस्तरॉमध्ये सेलिब्रेटींच्या नावाचे खा डिश तयार करून त्यांना मेन्यूमध्ये सामील केले जात आहे. अशाप्रकारेच 'किक'ची हिरोइन जॅकलिन फर्नांडिसच्या नावाने एक सॅलेड डिश तयार करून ते रेस्तरॉच्या मेन्यूमध्ये सामील करण्यात आले आहे.
श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन ने कोलंबोमध्ये एक रेस्तरॉ सुरु केले आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु नवीन गोष्ट अशी, की तिच्या नावाने मुंबईमध्ये एक सॅलेड डिश तयार करण्यात येणार आहे. मुंबईच्या वांद्रा कॅफेमध्ये एका सॅलेडच्या डिशला जॅकलीनच्या नावाने सजवण्यात येणार आहे. ही डिश आरोग्यसाठी लाभदायक आहे. त्याची रेसिपी जॅकलिनने स्वत: सांगितली होती.
सांगायचे झाले तर जॅकलिन आणि वांद्रा कॅफेची मालकिन मिशाली चांगल्या मैत्रीणी आहेत. जॅकलिनने सांगितले, 'एक दिवशी मिशाली माझ्या घरी आली तेव्हा मी माझ्या आवडते बीटरुट फीटा सॅलेड बनवून तिला खाऊ घातले. मी बनवलेले सॅलेड तिला ते खूप आवडले. मी मिशालीला म्हणाले, तिच्या कॅफेमध्ये बीटरुट सॅलेड नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. कारण मी ज्या कॅफेमध्ये जाते तिथे मला ही डिश आरामात मिळते.' जॅकलिनचे ऐकल्यानंतर मिशालीने ही डिश तिच्या कॅफेच्या मेन्यूमध्ये सामील केली. परंतु जॅकलिनचे नाव या डिशला देण्यात आले.
पुढे वाचा... जाणून घ्या बॉलिवूडच्या काही स्टार्सविषयी ज्यांच्या नावाने सुरु आहेत काही डिशेस...