आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dishkiyaoon Dialogue Sunny Deol Delivers Some Solid Punches

‘गांधी बोला हिंसा नहीं करने का, कोई माना...', वाचा 'ढिश्कियाऊं'चे Dialogue

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिल्व्हर स्क्रिनवर 'ढिश्कियाऊं' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात हरमन बावेजा आणि सनी देओल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिल्व्हर स्क्रिनवर सनी नेहमी दमदार डायलॉग्स बोलताना दिसतो, मात्र 'ढिश्कियाऊं'मध्ये त्याला खूप साधे संवाद देण्यात आले आहेत.
'ढिश्कियाऊं'मध्ये सनीने पडद्यामागचे पात्र साकारले आहे. त्यामुळे सिनेमात साधे आणि लहान संवाद त्याला देण्यात आले आहेत. लकवा हे त्याचे सिनेमातील नाव आहे. त्याच्या हातात गँगस्टरचे ट्रिगर असते आणि तो विक्की (हरमन)चा काडतुसाप्रमाणे वापर करतो.
सनीने या सिनेमात जे संवाद म्हटले आहेत, ते त्याच्या इतर सिनेमांच्या तुलनेत खूप फिके आहेत. सिनेमात एके ठिकाणी तो म्हणतो, ‘जिंदगी सांप-सीढ़ी जैसी है। सीधी चला तो मौज, लेकिन टेढ़ी चला तो...मौत।’
खरं तर त्याच्या मागील सिनेमांच्या तुलनेत हे संवाद फिके आहेत. दुसरीकडे हरमनला सिनेमात काही चांगले संवाद देण्यात आले आहेत. ‘गांधी बोला हिंसा नहीं करने का...कोई माना? पिस्तौल दिखाकर बोलता ना, तो साले सब मान जाते' हा हरमनने म्हटलेला संवाद प्रेक्षकांच्या पसंतीला पडतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, ‘ढिश्कियाऊं’मध्ये हरमन आणि सनीने आणखी कोणकोणते डायलॉग्स म्हटले आहेत...