आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्याच्या रहस्यमयी मृत्यूने बॉलिवूडला पोहोचला होता मोठा धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. दिवसेंदिवस ही यादीच वाढतच चालली आहे. यापैकी काही अभिनेत्री येथे तग धरुन राहतात, तर काहींवर अभिनयाला रामराम ठोकण्याची वेळ येते. मात्र काही अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या अभिनय आणि अंदाजासाठी ओळखले आणि स्मरले जाते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. नव्वदच्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेलेल्या दिव्या भारतीची 5 एप्रिल रोजी 21वी पुण्यतिथी होती. 5 एप्रिल 1993 रोजी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी दिव्याने या जगाचा निरोप घेतला.
मुंबई स्थित वर्सोवा येथील आपल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन दिव्या पाय घसरुन पडली होती. पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळून तिचा मृत्यू झाला होता. दिव्याने आत्महत्या केली होती की तिची हत्या करण्यात आली, हे आजही न उलगडलेले कोडे आहे.
दिव्याने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. तिचे जास्तीत जास्त सिनेमे हिट ठरले. अल्पावधीतच यशोशिखर गाठणा-या दिव्याने कमी वयातच लग्न केले. मात्र हे लग्न तिचे आयुष्य उद्धवस्त करणारे ठरले.
दिव्याच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...