आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

37 वर्षांची झाली पंजाबी कुडी दिव्या दत्ता, छायाचित्रांमध्ये पाहा तिच्या ग्लॅमरस अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ताचा जन्म 25 सप्टेंबर 1977 रोजी लुथियाना, पंजाबमध्ये झाला. दिव्याने फिल्मी करिअरची सुरुवात पंजाबी टेलिव्हिजन कमर्शिअलमध्ये मॉडेलिंगमधून केली. 1994मध्ये दिव्याने 'इश्क मे जीना इश्क मे मरना' सिनेमामध्ये छोटी भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'अग्निसाक्षी', 'छोटे सरकार', 'राम और शाम' सिनेमांत अभिनय केला. मात्र तिला खरी ओळख 'ट्रेन टू पाकिस्तान' सिनेमातून मिळाली.
कमर्शिअल सिनेमात दिव्या दत्ताला यश चोप्रा यांच्या 'वीर-जरा' सिनेमातून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर दिव्याचे करिअर यशस्वी मार्गाने जाऊ लागले. तिने, 'स्पेशल 26', 'भाग मिल्खा भाग' आणि 'रागिनी एमएमएस 2'सारख्या चर्चेतील सिनेमांमध्ये काम केले आहे. उत्कृष्ट अभिनायाच्या बळावर तिने सिने अवॉर्ड, आयफा अवॉर्डसह इतर पुरस्कारही नावी केले आहेत. अभिनयाशिवाय, दिव्या अनेक वर्तमानपत्रात लव्ह अँड रिलेशनशिपसारख्या विषयांवर लेखसुध्दा लिहिते. नेहमीच चुलबुल्या अंदाजात वावरणारी दिव्या दत्ताची अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्याच्या बर्थडे निमित्त तिची काही ग्लॅमरस छायाचित्रे...