दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. सगळ्यांची शॉपिंगची लगबग सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. अशा वेळी आपले आवडते सेलिब्रिटी कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांमध्ये असते.
प्रेक्षकांची ही उत्सुकता ताणून न धरता आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचे दिवाळी प्लान्स खास त्यांच्याच शब्दांत सांगणार आहोत..
CELEBRITY DIWALI या आमच्या स्पेशल सदरात आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री मृणाल दुसानिस, अभिनेता सुबोध भावे आणि गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या दिवाळी प्लान्सविषयी सांगत आहोत.
चला तर मग तुमचे हे लाडके सेलिब्रिटी कशी साजरी करणार आहेत दिवाळी, जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांत...