आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : 'डॉली की डोली' चा ट्रेलर लाँच, ग्लॅमरस लूकमध्ये अवतरल्या मलायका आणि सोनम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या बॅनरच्या 'डॉली की डोली' या चित्रपटावर काम करत होता. याचा पहिला ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. शिवाय चित्रपटाचे तीन पोस्टरदेखील लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये सोनम नवरीच्या वेशात लेदर जॅकेट, स्पोर्ट‌्स शूज घातले आहेत.
चित्रपटामध्ये ती डॉलीचे पात्र साकारत असून आपल्या जोडीदाराची निवड करण्यासाठी ती अयोग्य मार्गाचा वापर करताना दाखवण्यात आली आहे. तिच्या आवडी-निवडी इतक्या वेगळ्या आहेत की सामान्य मुलगा तिला पसंत करण्यास धजावत नाही. सध्या सोनमच्या पोस्टरची इंडस्ट्रीमध्ये बरीच चर्चा आहे.
या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सोनम कपूर आणि अरबाज खानसोबतच मलायका अरोरा खान, सलीम खान, राजकुमार राव सहभागी झाले होते. पुढील वर्षी 23 जानेवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ट्रेलर लाँचवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...