आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डोंट नो...' पाहण्याचा पहिला मान नॉर्वेच्या महाराणीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लता मंगेशकरांचे बर्‍याच दिवसांपासून एकही चित्रपट गीत ऐकायला मिळाले नव्हते. मात्र, नुकतेच त्यांनी 'डोंट नो व्हाय-2' या चित्रपटासाठी एक गाणे गायले आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. समलैंगिक संबंधांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा हा सिक्वेल दोन दिग्दर्शकांनी मिळून बनवला आहे. ही जबाबदारी भारताचा संजय शर्मा आणि नॉर्वेचा टॉन्जे जेवजॉन यांनी पार पाडली आहे. चित्रपट निर्माता युवराज पराशरने सांगितले की, हा चित्रपट सर्वप्रथम नॉर्वेच्या महाराणीला दाखवण्यात येईल. याच कारणामुळे चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शन लवकर पूर्ण करून ट्रायलची तयारी केली जात आहे.
चित्रपट नॉर्वेच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने नॉर्वेचे दिग्दर्शकदेखील याचे दिग्दर्शन करत आहेत. युवराजने सांगितले की, या चित्रपटात लताजींनी गाणे गायले आहे. हिंदी चित्रपटात गायन करणे जवळजवळ बंद केलेल्या लताजींनी मागील चित्रपटातदेखील आवाज दिला होता. या वेळीही त्यांना आम्ही विनंती केली. लता मंगेशकर यांना गाण्याचे बोल पसंत पडल्याने त्यांनी हे गाणे गाण्यासाठी तत्काळ होकार दिला.
(वरील छायाचित्रात युवराज पराशर आणि कपिल लता मंगेशकरांसोबत.)