आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डबल शिफ्टमध्ये काम करते बिपाशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिपाशा लवकरच एक फिटनेस डीव्हीडी लाँच करणार आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. चित्रीकरणालाही वेळ देऊन ती यावर काम करत आहे.
कामात किती ही व्यग्र असली तरी अभिनेत्री बिपाशा बसू व्यायाम करणे सोडत नाही. आउटडोर शूट्सच्या वेळीही तिच्यासोबत आरोग्य प्रशिक्षक असतात. आरोग्याविषयी जागरूक असणार्‍या बिपाशाने एक फिटनेस डीव्हीडी काही दिवासांपूर्वी लाँच केला होता. आता ती आपल्या दुसर्‍या फिटनेस डीव्हीडीवर काम करत आहे. चित्रपटाच्या व्यग्रतेमुळे हे काम पूर्ण करू शकत नव्हती; पण आता ठरल्याप्रमाणे डीव्हीडी लाँच करण्यासाठी बिपाशा दोन्ही कामांसाठी वेळ काढत आहे. यासाठी ती 12 तास सराव करते. डीव्हीडीत दिले गेलेले काम ती स्वत: करून पाहत आहे. याबरोबरच ती रोजचा व्यायामदेखील करते. ती म्हणते, प्रत्येक कामाचा ठरलेला पॅटर्न असतो, त्याला तोडने योग्य नाही. ती म्हणते, मला सर्वच वजन कमी करण्यासाठी उपाय विचारतात. त्यामुळे त्या लोकांना या डीव्हीडीचा फायदा मिळावा, अशी माझी इच्छा आहे.
बिपाशाने अलीकडेच एक हॉलीवूड चित्रपट साइन केला आहे. महेश भट्टने ‘जिस्म 2’ चित्रपटासाठी सन्नी लियोनच्या आधी बिपाशा आणि जॉनला विचारणा केली होती; पण तिने नकार दिल्यामुळं सन्नीला घेण्यात आले. ‘जिस्म’ च्या पहिल्या भागात बिपाशाने काम केले होते त्यामुळे तू सन्नीला काही टिप्स दिल्यात का यावर ती म्हणाली की, मी कुणालाही टिप्स दिल्या नाहीत, कारण भट्टसाहेब योग्य लोकांनाच निवडतात. लग्नाचा काय विचार आहे? यावर ती म्हणाली की, अजून मला मि. राइट भेटलेला नाही. जेव्हा भेटेल तेव्हा मी सांगेल.
बिपाशा नव्या मित्राच्या शोधात ?
बॉलीवूडमध्ये कोणीही मित्र नाही !- अभिनेत्री बिपाशा बसू
बिपाशा बासू खरी बंगालन