आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांची उत्कंठता वाढविणारा 'DREAM MALL'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगभरात घडत असलेल्या बलात्कार प्रकरण आणि महिलांचा केलेला विनयभंगाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात स्त्रियांची सुरक्षिता हा अत्यंत ज्वलंत आणि संवेदनशील विषय बनला आहे. एकीकडे महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असताना त्यांच्यावर होणा-या अत्याचारामुळे सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लक्षात घेऊन निर्मात्या रेखा पेंटर यांच्या व्हाईट लायन पिक्चर्स या निर्मिती संस्थेने 'ड्रीम मॉल' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ड्रीम मॉलचे लेखन - दिग्दर्शन सूरज दत्ताराम मुळेकर करीत आहेत.
नावाप्रमाणे अनोख्या असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईतील एका भव्य मॉलमध्ये सुरु असून या निर्मात्यांनी कलाकारांची नावे गुप्त ठेवल्याने चित्रपटसृष्टीत या चित्रपटाची बरीच चर्चा आहे.
'ड्रीम मॉल' ची संपूर्ण कथा केवळ एका रात्रीत घडते. सई नामक २२ वर्षीय तरुणी ही मॉलमधील एका ऑफिसमध्ये काम करते. एके दिवशी सईला ऑफिसमधून निघायला खूप उशीर होतो आणि ती त्या प्रचंड मोठ्या मॉलमध्ये अडकून पडते… आणि सुरु होतो जीवघेणा खेळ. मानवी मनाच्या अनाकलनीय भावना आणि तिचा प्रवास… एका रात्रीचा… आयुष्यात आलेली एक रात्र सईला कोणत्या वळणावर नेऊन सोडते हे गुढ रहस्य तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिथयश तंत्रज्ञाची टीम आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन साजन पटेल आणि अमेय नरे या जोडगोळीने केले असून धनराज वाघ हे ड्रीम मॉलचे सिनेमेटोग्राफर आहेत. प्रशांत घडशी यांनी चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून श्रेयस पंचाल यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. धनराज सावंत यांनी गीतरचना केली असून विजय भोपे हे त्यांचे साउंड रेकॉडिस्ट आहेत. वेशभूषा संतोष गावडे यांची असून मेकअप सुनील सावंत यांनी केला आहे. या चित्रपटाचे तांत्रिक व्यवस्थापन काईटस सिने क्राफ्ट्स यांनी केले आहे.
देशातील सद्य स्थितीचे सार्थचित्रण, उत्कंठावर्धक कथा आणि मराठीतील नामवंत कलाकार यामुळे 'ड्रीम मॉल'च्या चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.