आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दुनियादारी\'चा नवा विक्रम, 45 दिवसांत जमवला 22 कोटींचा गल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जुलै हा महिना मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. या महिन्यात संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडित काढत नवा विक्रम केला आहे. या सिनेमाने 45 दिवसांत तब्बल 22 कोटींचा गल्ला तिकिटबारीवर जमवला आहे. यापूर्वी 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या सिनेमाने शंभर दिवसांत 23 कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र 'दुनियादारी'ने रिलीजच्या केवळ 45 दिवसांतच एवढा गल्ला जमवला आहे. भविष्यात हा सिनेमा 30 कोटींपेक्षा अधिक कमाई करेल असा विश्वास सिनेमाच्या टीमने व्यक्त केला आहे. दुनियादारी सिनेमाच्या पडद्यामागील रंजक गोष्टी जाणून घ्या.


19 जुलै रोजी रिलीज झालेल्या 'दुनियादारी' या सिनेमाला रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर हाऊसफूलचे बोर्ड लागले.
या सिनेमाच्या यशाचे गमक आहे तरी काय ? याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 'दुनियादारी'च्या यशामागचे गमक...