बॉलिवूडचे सर्वाधिक सिनेमांमध्ये एक हिरो, एक हिरोईन आणि एक खलनायक हे स्वरुप ठरलेले असते. परंतु जेव्हा निर्माता अबिस रिवजी आणि कमल सदाना यांनी एक सिनेमा तयार करण्याचा विचार केला तेव्हा मनाशी निश्चय केला होता, की टीपिकल बॉलवूड सिनेमा कदापि बनवायचा नाही. तेव्हा त्यांनी 'रोर: टायगर ऑफ द सुदरबंस' बनवण्याचा निर्णय घेतला. अबिस यांनी या सिनेमाविषयी सांगितले, की आम्हाला ठाऊक होते, की हा खूप वेगळ्या थाटणीचा सिनेमा असेल.
शूटींगव्यतिरिक्त सिनेमाची कास्टिंगदेखील खूप कठिण होती. माझी इच्छा होती, की सिनेमाच्या प्रत्येक पात्राने वेगळी कहानी मांडावी. अबिस यांच्या या म्हणण्यावर कमलसुध्दा साथ देतो. त्यांनी सांगितले, 'आम्ही सिनेमासाठी जवळपास 600 लोकांचे ऑडिशन घेतले. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे आणि पात्रात तंतोतंत बसणारे स्टार्स मिळत नाही तोपर्यंत आम्ही सिनेमा सुरु करणार नव्हतो.'
कास्ट फायनल झाल्यानंतर आम्ही 40 दिवसांपर्यंत सुंदरबंसमध्ये शूटींग केले. सुंदरवनाच्या वाघांची भिती आणि त्यांना वाचवण्याचे अटोकाट प्रयत्न दाखवले आहेत या सिनेमात दाखवण्यात आले आहेत.
अभिनव शुक्लाचा एक मुख्य अभिनेता म्हणून पहिलाच सिनेमा आहे. अभिनव अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. त्यामध्ये 'जर्सी नंबर 10', 'गीत', 'जाने क्या बात हुई', 'छोटी बहू', 'एक हजारो म मेरी बहना है', 'हिटलर दीदी' आणि 'बदलते रिश्ते की दास्तान' या मालिका सामील आहेत.
सिनेमात त्यांच्यासह पुल्कित जवाहर, प्रणय दीक्षित, अचिंत कौर, विरेंद्र सिंहसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा अबिस रिजवी यांनी निर्मित केला असून 31 ऑक्टोबर 2014 रोजी रिलीज होत आहे. हा सुंदरवनवर बेतलेला हा पहिला सिनेमा असणार आहे. यापूर्वी जंगलाची थीम घेऊन कासुध्दा बनला होता. परंतु हा जरा वेगळ्या थाटणीचा मानला जात आहे.