आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांना \'ईद मुबारक\' म्हणण्यासाठी चक्क घराच्या रेलिंगवर चढला शाहरुख, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख अशाप्रकारे रेलिंगवर चढला.)
मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान दरवर्षी ईदचा सण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत असतो. यादिवशी तो आपल्या चाहत्यांची आवर्जुन भेट घेतो. चाहतेसुद्धा त्याला ईदच्या शुभेच्छा देतात आणि त्याच्या यशासाठी प्रार्थना करत असतात.
यावर्षी मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करण्यात आला. यावर्षीही शाहरुखने आपल्या चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. शाहरुखच्या वांद्रास्थित मन्नत या बंगल्याच्या बाहेर मोठ्या संख्येत चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुखनेसुद्धा आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. तो चक्क आपल्या घराच्या रेलिंगवर चढला आणि स्वतःची एक झलक आपल्या चाहत्यांना दाखवली. यावेळी पाऊस पडत होता. पावसात शाहरुख रेलिंगवर चढला आणि चाहत्यांना ईद मुबारक म्हटले. यावेळी तो व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्समध्ये दिसला. त्याने कपाळावर एक ब्लू कलरचा कापड बांधला होता.
यावर्षी शाहरुखचा 'हॅपी न्यू इयर' हा सिनेमा रिलीज होणार असून फराह खान सिनेमाची दिग्दर्शिका आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाच्या वर्ल्ड प्रमोशनसाठी शाहरुख येत्या सप्टेंबरपासून SLAM! the tour ला सुरुवात करणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुख आणि त्याच्या चाहत्यांची खास छायाचित्रे...