आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sex Scandal : श्वेता प्रसाद, दिव्याश्रीनंतर आता 8 ज्युनिअर आर्टिस्टना एजंटसह अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रे वरील बाजुला डावीकडून श्वेता बसू, दिव्याश्री आणि खाली अटक झालेल्या तीन महिला एजंट)

मुंबई: बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री श्वेता प्रसाद हिला हैदराबादमधून सेक्स रॅकेटप्रकरणी अटक होऊन काही दिवस लोटत नाही तोच, मुंबई पोलिसांनी आता एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून तीन महिला एजंटला अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवणा-या या महिला एजंट श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करायच्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या मॉडेल्स आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा वापर करत असल्याचे माहितीत उघड झाले आहे. या महिला एजंटनी ज्युनिअर आर्टिस्टला बॉलिवूडमध्ये सप्लाय करण्याची बातमीही पुढे आलीय.
पोलिसांनी ह्युमन ट्रॅफिकिंग विरोधी शाखेसोबत मिळून शनिवारी मीरा रोड येथे छापा टाकला. या दरम्यान पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. या महिला बॉलिवूडच्या ज्युनिअर आर्टिस्टसाठी एजंट म्हणून काम करत होत्या. पोलिसांनी एजंटजवळून कंडोम आणि 3000 हजार रुपयेही जप्त केले. या तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे. भाईंदरमध्ये राहणारी यास्मीन शेख आणि नायगांवला राहणारी प्रज्ञा सावे अशी त्यांची नावे आहेत. तर तिसरी महिला एजंट मीरा रोडवर राहणारी रूबीना शेख असे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आणखी आठ ज्युनिअर महिला कलाकारांनाही त्यांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार ज्युनिअर आर्टिस्टचे वय 20-26 वर्ष आहे आणि या ग्राहकांकडून एका दिवसात 20 ते 50 हजार रुपये घ्यायच्या.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कधी झाली होती श्वेता आणि दिव्याश्रीला अटक...