मुंबईः '
पीके' हा सिनेमा रिलीज होताच सर्व स्तरातून
आमिर खानचा अभिनय आणि राजकुमार हिराणी यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे. तसे पाहता कौतुक होणे स्वाभाविकच आहे. कारण सिनेमा बघून थिएटरबाहेर पडणा-या प्रत्येक व्यक्तीच्या चेह-यावर आनंद दिसतोय.
जर तुम्ही या विकेण्डला 'पीके' बघण्याचे ठरवले असेल, तर नक्की जा. एकटे नव्हे तर सहकुटुंब सिनेमा बघण्याची मजा तुम्ही अनुभवू शकता. हा सिनेमा आमिरच्या यापूर्वीच्या सिनेमांपेक्षा अगदी वेगळा असून तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही तुम्हाला हा सिनेमा का बघावा यामागची आठ खास कारणे सांगत आहोत.
कारण क्रमांक 1
आमिरचा नवीन लूक
आजवर
आपण आमिरचे अनेक लूक सिल्व्हर स्क्रिनवर पाहिले आहेत. 'लगान'मध्ये गावातील तरुण, 'थ्री इडियट्स'मध्ये विद्यार्थी आणि 'गजनी'मध्ये सिक्स पॅक अॅब्समध्ये आपण त्याला पाहिले आहे. मात्र 'पीके'मधील त्याचा लूक आधीच्या सिनेमांपेक्षा अगदी हटके आहे. मोठे डोळे, बाहेर आलेले कान, तोंडात पान आणि रंगिबेरंगी कपड्यांमध्ये तो दिसतोय. आमिर या लूकमध्ये कुल दिसतोय.
पुढील स्लईड्समध्ये जाणून घ्या सात अन्य कारणे...