आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक था टायगर'मध्ये पाकिस्तानचा अपमान केलेला नाही'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने 'एक था टायगर'च्या प्रोमोजवर बंदी घातल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान दुःखी झाले आहेत. सिनेमा न पाहताच त्यावर बंदी का घातली, असा प्रश्न कबीर खान आणि सलमानला पडला आहे. 'एक था टायगर' हा सिनेमा पाकिस्तानविरोधी असल्याचं कारण सांगून तेथे चित्रपटाच्या प्रोमोवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र 'एक था टायगर'मध्ये पाकिस्तानला शत्रू मानले नसल्याचे कबीर खानचे म्हणणे आहे.

कबीर खान यांनी आपल्या ट्विटरवर अकाउंटवर ट्विट केले की, 'मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, 'एक था टायगर' हा चित्रपट पाकिस्तानविरोधी नाहीये. आजच्या काळात एखाद्या देशाविरोधात चित्रपट तयार करणे म्हणजे मुर्खता असल्याचे मी मानतो.' विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारला हे पटवून देण्यासाठी दिग्दर्शक कबीर खान आणि खुद्द अभिनेता सलमान खानने पाकिस्तानला जाण्याच्या विचारात आहे.

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने देशातील केबल ऑपरेटर आणि टीव्ही वाहिन्यांना 'एक था टायगर'चे प्रोमो प्रसारित करु नये, अशा आशयाचे एक पत्र पाठवले आहे. या सिनेमात इंटर-स्टेट इंटेलिजन्स म्हणजेच आयएसआय या पाकिस्तानच्या सरकारी संघटनेची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेंसॉर ऑफ पाकिस्तानकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळत नाही, तोपर्यंत 'एक था टायगर'चा कुठलाही प्रोमो टीव्ही, रेडिओवरून प्रसारित करायचा नाही असे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तान सेंसॉर बोर्ड चित्रपट बघून तेथे चित्रपटावर असलेली बंदी उठवतील, अशी आशा कबीर खानने व्यक्त केली आहे.
‘एक था टायगर’मुळे पाकचे पित्त खवळले! आयएसआयची बदनामी केल्याचा आरोप
कतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण !
PHOTOS : तीन वर्षांनंतर एवढ्या जवळ आले कॅट-सलमान
कॅट म्हणते, सलमान आता तरी लवकर लग्न कर !