आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Release: आज पडद्यावर झळकला सिध्दार्थ-श्रध्दा-रितेशचा 'एक व्हिलेन', पाहा सिनेमाचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एक व्हिलेन'च्या एका सीनमध्ये सिध्दार्थ आणि श्रध्दा
मुंबई: आज (27 जून) बॉक्स ऑफिसवर 'एक व्हिलेन' रिलीज झाला आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच सिनेमाची गाणी सुपरहिट झाली आहेत. गाणी प्रेक्षकांचे थिएटरपर्यंत आणण्यास यशस्वी होऊ शकतात. 'स्टुडेंट ऑफ द इअर' फेम सिध्दार्थ मल्होत्रा आणि 'आशिकी 2' फेम श्रध्दा कपूर यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. दोन्ही स्टार्सनी सिनेमाला हिट करण्यासाठी खूपच कष्ट घेतले आहे. टीव्ही मालिकांपासून ते टीव्ही शोपर्यंत सर्वच ठिकाणी दोन्ही सेलेब्सनी सिनेमाचा परिचय लोकांना करून दिला.
'एक व्हिलेन'चे बजेट 25 कोटींचे आहे. सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर सिनेमा पहिल्याच आठवड्यात खर्चाची भरपाई करू शकतो. मागील आठवड्यात रिलीज झालेल्या 'हमशकल्स'चा फिडबॅक चांगला नसूनदेखील सिनेमाने 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. 'एक व्हिलेन' रिलीज झाल्यानंतर 'हमशकल्स'वर त्याचा परिणाम होऊ शकतो. 'एक व्हिलेन'चे दिग्दर्शन मोहित सूरीने केले असून एकता कपूरने निर्मित केला आहे.
'एक व्हिलेन' हा 'ऑय सॉ द डेव्हिल' या कोरिअन सिनेमाने प्रेरित आहे. आतापर्यंत कॉमिक भूमिका साकारणारा रितेश देशमुख यावेळी नवीन अवतारात दिसणार असून सिध्दार्थ नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'एक व्हिलेन'ची काही निवडक छायाचित्रे...