आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहित सुरी : सुपर स्टारडमपासून आता एक पाऊल दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - 'एक व्हिलेन' या सिनेमातील एक दृश्य)

या आठवड्यात एकता कपूरचा 'एक व्हिलेन' आणि इंग्रजीतील 'ट्रान्सफॉर्मर्स 4' प्रदर्शित झाले. प्रिंट व प्रचारासहित 'एक व्हिलेन'चा खर्च 40 कोटी इतका झाला आहे. एकताने फक्त भारतात वितरणाचे अधिकार 25 कोटींत विकले आहेत. संगीत, सॅटेलाइट आणि विदेशी वितरण अधिकारांपासून 22 कोटींची कमाई झाली आहे. चित्रपट प्रदर्शनापूवीच फायद्यात असून चित्रपट व्यवसायात या भाषेला 'टेबल प्रॉफिट' म्हटले जाते. 'एक व्हिलेन'मध्ये दिग्दर्शक मोहित सुरी हा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
मोहितने कमी वयातच चित्रपटांची निर्मिती करण्याचे सुरू केले. गेल्या अनेक दशकांपासून त्याने अनेक सुपरहिट चित्रपट तयार केले आहेत. तो तरुणाईमधला सर्वाधिक विश्वसनीय दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. आपले मामा भट्ट बंधूंच्या कॅम्पच्या बाहेरील हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या समोरील आव्हानाची ही लढाई त्याने चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीताद्वारे जिंकली आहे. पहिल्याच प्रोमोने तरुण वर्गावर जादू केली आहे. गेल्या एक दशकापासून मोबाइल, इंटरनेट, फेसबुक आणि अन्य साधनांमुळे मोठय़ा शहरात आणि छोट्या शहरांदरम्यान विचाराचा एक सेतू बनला आहे. समान विचारधारा असल्याकारणाने मोठया शहराच्या अतिरिक्त छोट्या शहरामध्येदेखील तरुण वर्गाचे चित्रपट बरोबरीचा चांगला व्यवसाय करत आहेत. 50 कोटींचा सरासरी व्यवसायावरती भारतातील वितरकांची रक्कम सुरक्षित होणार, असे चित्र आहे.
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हमशकल्स'ने आठवड्याच्या शेवटी 36 कोटींचा चांगला व्यवसाय केला. सोशल मीडियावरती चित्रपटाची बरीच प्रशंसादेखील झाली. या चित्रपटामुळे मात्र फाक्स स्टार स्टुडिओला नुकसान झाले.