आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: रितेश, सिद्धार्थने दिग्दर्शकसोबत साजरा केला 'एक व्हिलन'च्या यशाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून रितेश देशमुख, मोहित सूरी आणि सिद्धार्थ मल्होत्रा)
मुंबई : 27 जून रोजी रिलीज झालेला आणि मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा पहिल्याच दिवशी 16.72 कोटींचा व्यवसाय करुन वर्षातील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. पहिल्या विकेंडपर्यंत या सिनेमाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
सिनेमाला मिळालेले यश बघता दिग्दर्शक आणि कलाकार खूप उत्साहीत आहे. हा आनंद ते पार्टी करुन साजरा करत आहेत. मंगळवारी उशीरा रात्री मुंबईतील सन अँड सेंड या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शक मोहित सुरीसोबत खूप मस्ती करताना दिसले.
पार्टीत रितेश, सिद्धार्थ आणि मोहित यांच्यासह गायक अंकित तिवारी, 'आशिकी 2'मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरच्या मित्राची भूमिका साकारणारा शाद रंधावा सहभागी झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'एक व्हिलन'च्या सक्सेस पार्टीत रितेश आणि सिद्धार्थने मोहित सुरीसह कशी धमाल केली....