आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एक व्हिलेन\'च्या सक्सेस पार्टीत स्टार्स, प्रेग्नेंट जेनेलियाही झाली सामील, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साध रंधावासह श्रध्दा कपूर आणि पत्नी जेनेलियासह रितेश देशमुख
मुंबई: रितेश देशमुख, सिध्दार्थ मल्होत्रा आणि श्रध्दा कपूर सध्या त्यांच्या 'एक व्हिलन'च्या यशात पार बुडाले आहेत. 'एक व्हिलन'ने जोरदार ओपनिंगसग यश मिळवले आहे. पहिल्या दिवशी 16.72 कोटींची कमाई करणारा हा यावर्षीचा दुसरा सिनेमा ठरला आहे.
काल (5 जुलै) वांद्रामध्ये 'एक व्हिलन'ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त रितेश, सिध्दार्थ आणि श्रध्दाव्यतिरिक्त सिनेमाचा दिग्दर्शक माहित सूरी, रितेशची पत्नी जेनेलिया, 'आशिकी 2' फेम आदित्य राय कपूर, साध रंधावा आणि कमाल रशिद खान अर्थातच केआरकेसह काही निवडक स्टार्स उपस्थित होते.
27 जून रोजी रिलीज झालेला हा सिनेमा 86.65 कोटींच्या घरात गेला आहे. लवकरच सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'एक व्हिलन'च्या सक्सेस पार्टीची काही छायाचित्रे...