आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एका लग्नाची दुसरी गोष्ट\' आता सिनेमाच्या रुपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या तुफान गाजलेल्या मालिकेतील सगळी पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. होय, राधा-घना यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी राधा-घना यांची जबरदस्त केमिस्ट्री मालिकेच्या नाही तर चक्क सिनेमाच्या रुपात पाहायला मिळणार आहे.
येत्या रविवारी म्हणजे 20 जानेवारीला संध्याकाळी सात वाजता 'सिनेमॅटीक - एका लग्नाची दुसरी गोष्ट' हा विशेष सिनेमा 'झी मराठी' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

सतीश राजवाडे दिग्दर्शित ' एका लग्नाची दुसरी गोष्ट ' ही मालिका तुफान गाजली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला प्रचंड प्रतिसाद दिला. मालिका संपल्यानंतर ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा आग्रह प्रेक्षकांनी केला. या मालिकेतील तुझ्याविना हे गाणेही प्रचंड गाजले होते. युट्यूबवर अल्पावधीतच या गाण्याला लाखोच्या संख्येत लाईक्स मिळाले होते.

ही मालिका सिनेमाच्या रुपात भेटीला आणण्याची संकल्पना झी मराठी वाहिनीची असून सतिश राजवाडे आणि विनोद लव्हेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखादी मालिका सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सिनेमॅटिक- एका लग्नाची गोष्ट' या सिनेमातून स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रेखा कामत, स्पृहा जोशी, इला भाटे, लीना भागवत, विवेक लागू हे सगळे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. चला तर मग पुन्हा एकदा घना आणि राधाला भेटायला सज्ज व्हा.