आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सौंदर्य आणि नृत्याचा अद्भूत मिलाफ \'एकापेक्षा एक अप्सरा आली\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता सासू सुनेच्या भांडणाची गॉसिप्स थांबतील, नायिक-खलनायिका यांच्या संघर्षाची धार बोथट होऊ लागेल... आता चर्चा रंगेल ती राधा आणि अभिलाषाच्या नृत्याच्या महासंग्रामाची. कारण मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय ग्लॅमरगर्ल सज्ज झाल्यात नृत्याच्या महासंग्रामासाठी...

मानसी नाईक, मेघा घाटगे, श्रुती मराठे, प्रार्थना बेहरे, नेहा गद्रे, हेमांगी कवी, सुकन्या काळण, दीप्ती केतकर, रुपाली भोसले, सारा श्रावण, प्राची चेऊलकर आणि प्राजक्ता माळी या अप्सरा सज्ज झाल्या आहेत नृत्याच्या एकापेक्षा एक अप्सरा आली या दिमाखदार पर्वासाठी.

सौंदर्यवतींचे हे लखलखते पर्व येत्या 1 जुलैपासून दर सोमवारी आणि मंगळवारी राऊ साडे नऊ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरु होत आहे. अलीकडेच या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण पार पडले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या शोविषयी आणखी काही...