आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगवास भोगत असलेला संजय दत्त अडकला वादात, एकताने परत मागितले 1.5 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तुरुंगात कैद असलेल्या अभिनेता संजय दत्तचे नाव पुन्हा एकदा वादाच्या भोव-याच अडकले आहे. यावेळी निर्माता एकता कपूरने 1.5 कोटी रुपयांसाठी संजयला कोर्टाची पायरी चढायला लावली आहे. एकताने संजयला ही रक्कम सुनील शेट्टीसोबत मिळून निर्मित करण्यात येणा-या सिनेमासाठी दिली होती.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, एकताने संजयची पत्नी मान्यताशी संपर्क साधून सांगितले होते, की पैसे परत करा आणि प्रकरण मिटवा. परंतु मान्यताने ऐकले नाही.
एकताशी निगडीत एका सूत्राने सांगितले, की 2008मध्ये एकता आणि संजय यांच्यात
सिनेमाबाबत एक डिल झाली होती, परंतु तेव्हा ही डिल होऊ शकली नव्हती. त्यानंतर सुनील शेट्टीच्या म्हणण्यावर एकताने संजयला 1.5 कोटी रुपये दिले होते.
सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे, संजला जेव्हा माहिती झाले होते, की एकताने 'शूटआट अॅड वडाला'ला निर्मित करण्यासाठी संजय गुप्ताशी हातमिळवणी केली आहे तेव्हा तो नाराज झाला होता. 2007मध्ये 'शूटआऊट अॅड लोखंडवाला'च्या शूटिंगवेशी संजय गुप्ता आणि संजय दत्त यांच्याच मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर दोघांनी एकत्र काम करणे आणि बोलणे बंद केले होते.
आता एकता 1.5 कोटी रुपयांचे प्रकरण कोर्टात सोडवणार आहे.