आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday: \'टीव्ही क्वीन\' एकताने सुंदर दिसण्याच्या नादात परिधान केले WORST ड्रेसेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही क्वीन एकता कपूरने आपल्या टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रींना ग्लॅमरस लूक देण्यासाठी डिझायनर्सची फौज उभी केली, मात्र स्वतःसाठी डिझायनरची नियुक्ती करण्यास कदाचित एकता विसरलेली दिसतेय. हे तिची विचित्र ड्रेसिंग स्टाईल बघून म्हणता येईल. भडक आणि उत्तेजक ड्रेसमुळे एकता अनेकदा थट्टेचा विषय ठरली आहे.
आज (7 जून) एकता कपूरचा वाढदिवस आहे. 7 जून 1975 रोजी जन्मलेल्या एकताचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र वडील आहेत. एकता बालाजी टेलिफिल्म्सची क्रिएटीव्ह हेड आहे.
वाईट ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा चर्चेत आली आहे एकता...
टीव्ही क्वीन आणि चित्रपट निर्माती एकता कपूरवर विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेकदा टीका झाली आहे. अलीकडच्या काळात 'लुटेरा' या आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या सिनेमाच्या सक्सेस पार्टीत एकता आपल्या ड्रेसमुळे थट्टेचा विषय ठरली होती. या पार्टीत एकताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस अतिशय विचित्र आणि भडक होता.
यापूर्वी 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळीसुद्धा एकताने असाच विचित्र ड्रेस परिधान केला होता. एकताचा हा ड्रेस एखाद्या चादरीप्रमाणे दिसत होते. हातात रत्नजडीत अंगठ्या आणि विचित्र ड्रेसमुळे ती एखाद्या जादुरगासारखी दिसत होती.
रिव्हिलिंग ड्रेसिंग स्टाइलमुळेही झाली आहे चर्चा...
सासू-सुनांच्या मालिकांसाठी प्रसिद्ध असलेली एकता उत्तेजक आणि भडक ड्रेसेस परिधान करण्यासाठीही ओळखली जाते. काही फंक्शन्समध्ये एकता बोल्ड ड्रेसेसमध्ये दिसली. हे कपडे अंगप्रदर्शन करणारे होते. स्टार गिल्ड अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यान एकताने परिधान केलेला ड्रेस पाहून सर्वच दंग झाले होते.
टीव्ही मालिकांमुळे आली प्रसिद्धीझोतात...
एकता कपूरने सासू-सुनांवर आधारित मालिका तयार करुन प्रसिद्धी मिळवली. तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार झालेल्या मालिकांमध्ये 'हम पांच', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं किसी रोज', 'कभी सौतन कभी सहेली', 'कहीं तो होगा', 'किस देश में है मेरा दिल', 'कसम से', 'कुमकुम', 'कुटुंब', 'बंदिनी', 'बड़े अच्छे लगते हैं' आणि 'जोधा अकबर' या मालिकांचा समावेश आहे.
सिनेनिर्मितीतूनही कमावले नाव...
एकता कपूरने 2001 मध्ये 'क्योंकी मैं झुठ नहीं बोलता' या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यानंतर 2003-04 मध्ये तिच्या प्रॉडक्शन हाऊसने 'कुछ तो है' आणि 'कृष्णा कॉटेज' या सिनेमांची निर्मिती केली.
याशिवाय 'शूट आउट एट लोखंडवाला', 'लव सेक्स और धोखा', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'रागिनी एमएमएस', 'द डर्टी पिक्चर', 'लुटेरा' आणि 'मैं तेरा हीरो' या सिनेमांचीही एकता निर्माती असून या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विचित्र ड्रेसमधील एकता कपूरची छायाचित्रे...