आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekta Kapoor, Rani Mukherjee, Shraddha Kapoor, Govinda, Shreyas Talpade And Sonu Sood Welcome Lord Ganesha At Their House In A Grand Way

Celebrity Ganesha: जितेंद्र, श्रद्धा कपूरसह या सेलेब्सच्या घरी बाप्पा झाले विराजमान, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शुक्रवारी सर्वत्र वाजतगाजत घरोघरी श्रींचे आगमन झाले आहे. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस तर कुणाकडे अकरा दिवसांसाठी बाप्पा वास्तव्याला आले आहेत. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड कलाकारांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. अभिनेते जितेंद्र, गोविंदा, शक्ति कपूर, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, सोनू सूद, विवेक ओबरॉय यांच्या घरी गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना झाली आहे.
जितेंद्र यांनी मनोभावे श्रींची पूजाअर्चा केली. यावेळी त्यांच्या पत्नी शोभा कपूर, मुलगी एकता कपूर आणि मुलगा तुषार कपूर यांनीही बाप्पाची पूजा केली. तर गोविंदाच्या घरीदेखील त्याचा मुलगा यशवर्धन आणि मुलगी नर्मदा यांनी श्रींची प्रार्थना केली.
शक्ति कपूर यांच्या घरीसुद्धा श्रींची विधिवत पूजाअर्चा झाली. यावेळी त्यांची मुलगी श्रद्धा कपूर आणि मुलगा सिद्धांत कपूर बाप्पाची पूजा करताना दिसले. विवेक ओबरॉयसुद्धा बाप्पांना आपल्या घरी घेऊन जाताना दिसला.
तर अभिनेत्री राणी मुखर्जीचीसुद्धा श्रींवर नितांत श्रद्धा आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी राणीने एका मंडळाला भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या बाप्पासाठी फुलांची खास सजावट केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बाप्पाची खास छायाचित्रे...