आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात ताविज, बोटात अंगठ्या, एकता कपूरची अंधश्रद्धा की आस्था?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंधविश्वास... अशी एक गोष्ट आहे, जी लोकांना पूर्णपणे बदलून टाकते. अंधश्रद्धाळू लोक प्रत्येक क्षेत्रात आहेत. मग बॉलिवूडला विसरुन कसं बरं चालेल. इंडस्ट्रीतील निर्माते-दिग्दर्शक असो किंवा स्टार्स असो, यश मिळवण्यासाठी हे लोक अनेकदा अंधश्रद्धाळू होतात. एकता कपूर इंडस्ट्रीतील ती व्यक्ति आहे, जी स्वतःला अंधश्रद्धाळू समजत नाही. मात्र यश मिळवण्यासाठी ती ज्या पद्धतींचा अवलंब करत असते, ते बघता कुणीही तिला कुणीही अंधश्रद्धाळू म्हणेल.
एकताने अलीकडेच 'मैं तेरा हीरो' या सिनेमाच्या यशाच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतील तिचा लूक बघून तिचा देवावर किती विश्वास आहे, हे दिसून आले. ग्रीन ड्रेसमध्ये तिचा लूक आकर्षक होता. यावेळी तिच्या दोन्ही हातात ताविज आणि खूप सारे धागे बांधलेले दिसले. शिवाय हाताच्या बोटांमध्ये रत्नजडित अंगठ्या घातल्या होत्या. अंगठ्या आणि ताविज बघता एकता याकाळात खूप पूजापाठ करत असल्याचे दिसून येत आहे.
याकाळात एकता ब-याच बॉलिवूड सिनेमांवर पैसा लावत आहे. निर्माती म्हणून ती यशस्वीसुद्धा होत आहे. मात्र सिनेमाचे शुटिंग सुरु होण्यापासून ते रिलीज पर्यंत ती असे कारनामे करते, जे बघून कुणीही तिला अंधश्रद्धाळू म्हणेल. 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमाच्या रिलीजच्या शेवटच्या क्षणी एकताना सिनेमाची सुरुवात हनुमान चालीसाने करण्याचा निर्णय घेतला. एकतासाठी चांगली गोष्ट म्हणजे, तिचा निर्णय योग्य ठरला आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला. या सिनेमाने भारतात आत्तापर्यंत 45 कोटींचा बिझनेस केला आहे. ही पहिली वेळ नव्हती जेव्हा एकताने शेवटच्या क्षणी बदल केले. यापूर्वी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्येही एकताने असेच बदल केले होते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या कोणत्या गोष्टी एकताला अंधश्रद्धाळू बनवतात...