आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकताचा 'फॉर्मुला सनी' बनला सिनेमा ट्रेंड, जाणून घ्या कसा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग्य विषय, सुपरहिट संगीत आणि उत्तेजक- हाच आहे 'फॉर्मुला सनी' ज्याच्या बळावर सनी लिओन अभिनीत 'रागिनी एमएमएस 2' सिनेमाने 55 कोटींचा व्यवसाय केला होता. 'रागिनी...'च्या निर्मितीचा प्रिन्ट-प्रचारासह खर्च मिळून एकूण 16 कोटी रुपये होता. या सिनेमाने निर्मितीपेक्षा दुप्पट-तिप्पट व्यवसाय केला.
वितरकांना आणि निर्मात्यांना या कमाईतून एकूण 25 कोटी रुपयांचा वाटा मिळतो. निर्माती एकता कपूरने 2 कोटी संगीत, 1 कोटी ओव्हरसीज आणि 1 कोटी आय व्हिडिओमधून इतके पैसे कमावले. अर्थातच तिने सिनेमावर 16 कोटी रुपये खर्च करून 29 कोटींचा व्यवसाय केला. 'रागिनी...'चा बॉक्स ऑफिसवरील व्यवसाय अमिताभ बच्चन, वरुण धवन, आदित्य राय कपूर, टायगर श्रॉफ आणि कंगना राणावत अभिनीत 'क्वीन' यांच्या कमाईच्या खूप जवळ आहे. काही सीन काटून 'रागिनी...' टीव्हीवर प्रसारित झाला असता तर सॅटेलाइट आधिकार विकून सिनेमाने 7 कोटी आणखी कमावले असते. त्यातून एकताला 7 कोटींचा फायदा झाला असता.
दोन वर्षांपूर्वी सरकारच्या वतीने प्रसारण नियमांच्या फेरबदलानंतर अडल्ट सिनेमांच्या सीन्समध्ये काट-छाट करून प्रसारित करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे 'बी.ए. पास' आणि 'नशा'सारखे सिनेमे टीव्हीवर प्रसारित केले जात नाही.
सनीचा 'रागिनी एमएमएस 2' अनेक निर्मात्यांसाठी सक्सेस फॉर्मूला ठरला आहे. निर्माते आता बजेटवर रिवर्क करत आहेत. जेणेकरून त्यांचे सिनेमे सॅटेलाइट अधिकार न विकता सिनेमा चांगला व्यवसाय करू शकतील. उत्तेजक, हॉरर आणि संगीतांना विविध कहान्यांमध्ये जोडले जात आहे.
त्यामध्ये कुमार मंगतचा बिपाशा बसु अभिनीत 'अलोन' हा हॉरर सिनेमा सुपरहि ट म्युजिकसह बनत आहे. 'हेट स्टोरी' सीरीजच्या दोन्ही सिनेमातून विक्रम भट्टला चांगला फायदा झाला होता. त्या बाळावर 'हे स्टोरी 3'चे प्लॅनिंग सुरु झाले आहे. तसेच, इतर नायिकांपेक्षा सनीकडे सर्वाधित सिनेमांचे ऑफर आहेत.
ती सध्या "टीना अँड लोलो’, "पटेल रॅप’, "मस्तीजादे’, "वन नाइट स्टँड’, "तेरा बेईमान लव्ह’ या पाच सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. यामधील कोणताच हॉरर जॉनर सिनेमा नाहीये. 'ग्रँड मस्ती'चा लेखक तुषार हिरानंदानीने 'मस्तीजादे' लिहला आहे. इतर सिनेमांमध्ये उत्तेजकच्या फॅक्टरचा भरपूर वापर करण्यात आला आहे. 'हेट स्टोरी 2'च्या 'पिंक लिप्स' गाण्याप्रमाणेच 'बलविंदर सिंह फेमस हो गया' दक्षिणच्या दोन सिनेमांमध्ये ती पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारत आहे.