मुंबईः बॉलिवूड अभिनेता
सलमान खान आणि त्याचे कुटुंब अर्पिता खानचा लग्नसोहळा शाही व्हावा यासाठी कोणतीच कसर शिल्लक सोडत नाहीहेत. या लग्नासाठी हैदराबादमधील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेस बूक करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अर्पिताच्या संगीत सेरेमनीत
आपल्या जवळच्या मित्रांनी आवर्जुन उपस्थिती लावावी, याकडे सलमान जातीने लक्ष देतोय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची जवळची मैत्रीण एली अवराम अर्पिताच्या लग्नात एक स्पेशल अपिअरन्स देणार असून त्यासाठी तिने तयारीसुद्धा सुरु केली आहे. एली आपल्या परफॉर्मन्ससाठी खूप उत्साहित आहे. अलीकडेच तिने गोव्यात पुलकित सम्राटच्या लग्नात हजेरी लावली होती. या लग्नाला
सलमान खानसुद्धा हजर होता.