आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teary Eyed Dharmendra, Hema Malini, Esha At Ahana Deol\'s Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहानाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण... लाडक्या लेकीला सासरी पाठवताना भावूक झाले होते धर्मेंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अहाना देओल हिच्या लग्नातील भावूक क्षण)
अभिनेते धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लाडकी कन्या अहाना देओलने 2 फेब्रुवारी रोजी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. 2 फेब्रुवारी 2014 रोजी दिल्लीतील बिझनेसमन वैभव वोरासोबत अहाना लग्नगाठीत अडकली होती. अहानाचे लग्न बॉलिवूडमधील शाही लग्नापैकी एक होते. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. थाटामाटात अहाना वैभवसह बोहल्यावर चढली.
आता मुलीचे लग्न म्हटल्यावर ती आपल्या नवीन संसाराला सुरुवात करणार याचा आनंद आणि ती आपल्याला सोडून जाणार याचे दुःख प्रत्येक आईवडिलाला होतं असतं. त्यामुळे लग्नात अशा भावूक क्षणांचे साक्षीदार आपण होत असतो. अहानाच्या लग्नात देखील तिचे आईवडील अर्थातच धर्मेंद्र आणि हेमा भावूक झाले होते. शिवाय आईवडिलांना सोडून जाणार असल्याचे दुःख अहानाच्याही चेह-यावर स्पष्ट दिसत होते. यावेळी अहानाचेही डोळे पाणावले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अहानाच्या लग्नातील भावूक क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.