आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान हाशमीला पश्चात्ताप होतो तेव्हा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘राजा नटवरलाल’ मधील सह नायिका हुमायिमा मलिक सोबत इम्रान.
आपल्या ‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमाच्या प्रचारादरम्यान इम्रान हाशमीने याचा उलगडा केला. तो म्हणाला की, माझ्या मुलाला कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात पाठवले, पण मी त्याच्यासोबत जाऊ शकलो नाही. त्यामुळे मी सिनेसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला, याचा मला पश्चात्ताप वाटतो. इम्रानने 2006 मध्ये त्याची प्रेयसी परवीनशी लग्न केले होते. गेल्या वर्षी त्याचा चार वर्षांचा मुलगा अयानला कॅन्सर असल्याचे निदान झाले. अयानच्या किडनीमध्ये गाठ होती. डॉक्टरांनी कॅन्सरची ही सुरुवात असल्याचे सांगितले होते.
मुलाच्या आजारामुळे हताश झालेल्या इम्रानने सांगितले की, ‘जेव्हा माझ्या मुलाला कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात पाठवले तेव्हा मी त्याच्यासोबत जाऊ शकलो नाही. त्यावेळी त्याला माझी अधिक गरज होती आणि नेमके त्याचवेळी माझ्या सिनेमाचे शेड्यूल होते.’
इम्रानने पुढे सांगितले की, ‘आता माझ्या मुलाची तब्येत चांगली आहे. जेव्हा तो उपचारासाठी विदेशात जात होता तेव्हा त्याला वाटले की, मी सुटी साजरी करण्यासाठी बाहेर जात असल्याने मी त्याच्यासोबत येत नाही. परमेश्वराच्या कृपेने माझा मुलगा कॅन्सरसारख्या आजारावर मात करू शकला.’सध्या इम्रान ‘राजा. ..’च्या प्रचारात व्यस्त आहे.