आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emraan Hashmi, Humaima Malick’S Monsoon Romance In 'Tere Hoke Rahenge'

पाहा इम्रान-हुमैमाचा मान्सून रोमान्स, 'तेरे होके रहेंगे...' गाणे रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('राजा नटवरलाल'च्या पोस्टरवर इम्रान हाशमी आणि हुमैमा मलिक)
मुंबई: इम्रान हाशमीच्या सिनेमाचा विषय निघताच, त्याच्या गाण्यांची आठवण सर्वांनाच होते. इम्रानच्या चाहत्यांची नजर त्याच्या सिनेमांसह गाण्यांवरही असते. इम्रानचा 'राजा नटवरलाल' या आगामी सिनेमाचे फस्ट ट्रॅक 'तेरे होके रहेंगे' या गाण्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.
हे गाणे अरजीत सिंहने गायले असून इम्रान आणि हुमैमा यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल 'तेरे होकर रहेंगे, दिल जिद पे अडा है...तेरे होकर रहेंगे, तेरा शौक चढा है' असे आहे. इम्रान गाण्यात कॉनमॅन नव्हे तर त्याच्या ड्रिम गर्लशी रोमान्स करताना दिसणार आहे. या गाण्याला पावसात शुट करण्यात आले आहे. त्यातून दोघांच्या मान्सून रोमान्सचे चित्र चाहत्यांना दिसणार आहे.
'राजा नटवरलाल'मध्ये इम्रान हाशमीने एक कॉनमॅनची भूमिका वठवली आहे. इम्रानच्या इतर सिनेमांप्रमाणेच यातही त्याच्या हिरोइनसह लिप-लॉकचा सीन आहे. कुणाल देशमुख दिग्दर्शित हा सिनेमा 29 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.
'राजा नटवरलाल'मधील हुमैमा आणि इम्रानच्या पावसातल्या रोमान्सची झलक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...