आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emraan Hashmi Humaima Malik Promote Raja Natwarlal

इम्रान-हुमैमाने रिक्शा चालकांसह केले सिनेमाचे प्रमोशन, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- दिग्दर्शक कुणाल देशमुख, हुमैमा मलिक आणि इम्रान हाश्मी)
मुंबई: इम्रान हाश्मीचा 'राजा नटवरलाल' हा आगामी सिनेमा शुक्रवारी (29 ऑगस्ट) रिलीज होणार आहे. त्यामुळे तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. प्रमोशनमध्ये त्याच्यासह पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक दिसणार आहे. हा हुमैमाचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा आहे.
या दोघांनी शनिवारी मुंबईच्या रिक्शा चालकांसह मिळून सिनेमाचे प्रमोशन केले. यावेळी इम्रान हाश्मी निळी जीन्स आणि ग्रे कलरच्या आउटफिटमध्ये दिसला. तसेच, हुमैमा ग्रे टॉप आणि लाल रंगाच्या स्कर्ट आउटफिटमध्ये दिसून आली. सिनेमा दिग्दर्शक कुणाल देशमुखसुध्दा या निमित्त या स्टार्ससह दिसला. प्रमोशनदरम्यान काही रिक्शा चालकसुध्दा उपस्थित होते. रिक्शा चालकांसाठी शनिवारी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.
'राजा नटवरलाल'मध्ये परेश रावल, के के मेनन यांच्याही भूमिका आहेत. इम्रानचे मागील वर्षी 'एक थी डायन' आणि 'घनचक्कर' हे दोन सिनेमे रिलीज झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या प्रमोशनवेळी इम्रान आणि हुमैमाचा लूक...