मुंबई: फोटोग्राफर्सकडून सलमानला बायकॉट करण्यात आलेल्या प्रकरणावर बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा रंगली आहे. या प्रकरणात अभिनेता इमरान हाशमीचे म्हणणे आहे, की हे प्रकरण त्वरीत सोडवले गेले पाहिजे. कारण बॉलिवूड आणि माध्यमे यांच्यात अतुट नाते आहे. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहे.
मुंबईमध्ये अलीकडेच, एका कार्यक्रमात इमरानला याविषयी मीडियाने प्रश्न केला होता. त्यावर त्याने सांगितले, मीडियाशिवाय स्टार्स आणि स्टार्सशिवाय मीडिया काहीच नाहीये. त्यामुळे हे प्रकरण त्वरीत सोडवण्यात यावे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानचा आगामी 'किक'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याच्या बॉडीगार्ड्सनी मीडियाच्या काही फोटोग्राफर्सना धक्काबुक्की केली. सोमवारी (14 जुलै) सलमानने टि्वट करून माफी मागण्याऐवजी फोटोग्राफर्सची खिल्ली उडवली. तो म्हणाला, मीडियी बायकॉट करत असल्याचा त्याला आनंद आहे, फोटोग्राफर्सनी फक्त आपल्या निर्णयावर ठाम राहावे.