आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान हाशमीने विकले \'KICK\'चे तिकीट, पाहा \'राजा नटवरलाल\'च्या प्रमोशनचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेटी थिएटर बाहेर 'किक'चे तिकीट विकताना इम्रान हाशमी
मुंबई: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी शनिवारी (26 जुलै) थिएटर बाहेर 'किक'चे तिकीट विकताना दिसला. हा त्याच्या 'राजा नटवरलाल' या आगामी सिनेमाचा एक भाग होता. शनिवारी (26 जुलै) अनेक मीडिया हाऊसने प्रेक्षकांना सूचना दिली होती, की इम्रानकडून तिकीट खरेदी करू नका. कारण त्यांना फसवले जाऊ शकते.
असेही सांगण्यात आले होते, की इम्रानकडून तिकीट घेताना काहींना शंका येणार नाही, मात्र तिकीट घेतल्यानंतर पश्चाताप करावा लागू शकतो. इम्रानने 'किक'चे खरे तिकीट विकले की खोटे अद्याप याची कोणतीच माहिती मिळालेली नाही. कारण सिनेमाचे प्रमोशन म्हणून तो 'राजा नटवरलाल'मधील त्याच्या पात्राप्रमाणे प्रेक्षकांना बनावट तिकीट देऊन फसवेल.
फसवले असले तरी प्रेक्षकांना त्यांचे पैसे वापस मिळाले असतील, कारण सिनेमाचे प्रमोशन करण्याचा त्याचा हा एक वेगळा अंदाज होता. इम्रानचा 'राजा नटवरलाल' हा सिनेमा येत्या 29 ऑगस्ट रोजी रिलीज होणार असून त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक, परेश रावल, दीपक तिजोरी आणि के के मेनन यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहे.
गेटी थिएटरच्या बाहेर तिकीट विक्री करणा-या इम्रान हाशमीला पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...