आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emraan Hashmi In A Promotional Song ‘UNGLI Pe Nachalein’

'उंगली'मधील 'उंगली पे नचाले' गाणे रिलीज, पाहा Video & Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('उंगली'मधील 'उंगली पे नचाले' गाण्यातील दृश्य)
मुंबईः इमरान हाश्मी अभिनीत 'उंगली' हा सिनेमा या महिन्यात रिलीज होणार आहे. या सिनेमातील एक नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 'उंगली पे नचाले' हे शब्द असलेल्या या गाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल आठ आयटम गर्ल्स झळकल्या आहेत.
या गाण्यात इमरानसोबत आयटम गर्ल्सच्या रुपात विदेशी मॉडेल्स दिसत आहेत. देव नेगी आणि शिप्रा गोयल यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. धर्मा प्रॉडक्शच्या इतिहासातील हे सर्वाधिक बोल्ड गाणे असल्याचे म्हटले जात आहे.
'उंगली' हा सिनेमा रेंसिल डीसिल्वा यांनी दिग्दर्शित केला आहे. इमरान हाश्मीसह या सिनेमात कंगना रनोट, रणदीप हुड्डा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या 28 नोव्हेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढे पाहा या गाण्याचा व्हिडिओ (दुस-या स्लाईडमध्ये) आणि छायाचित्रे...