आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emran Hashmi With Humayama In Jaipur For Promotion Of Raja Natwarlal

पाकिस्तानी अभिनेत्रीसह पोहोचला 'राजा नटवरलाल', चाहत्यांची उसळली अशी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('राजा नटवरलाल' सिनेमातील अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलेले छायाचित्र)
जयपूर - कौटुंबिक कलह निर्माण झाल्यास आत्मविश्वासाने ते दूर केले जाऊ शकतात, आम्ही सर्वांनी मिळून मार्ग निवडला आणि मी पुन्हा एकदा कामाला लागलो आहे. मुलगा आता बरा असून शाळेत जाऊ लागला. कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यानंतर आता नटवरलाल बनून तुमच्यासमोर आलो आहे, असे सांगून अभिनेता इमरान हाश्मीने जयपूरकरांची भेट घेतली.
आगामी 'राजा नटवरलाल' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने इमरान हाश्मी अलीकडेच जयपूरमध्ये आला होता. यावेळी त्याच्यासह पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक सोबत होती. हुमैमा या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत आहे.
पाकिस्तानी आणि फॅमिली आनंदी...
पाकिस्तानात सिनेमाला विरोध झाला का? असा प्रश्न हुमैमाला विचारला असता, तिथे असे काहीही घडले नाही, असे हुमैमा म्हणाली. नुकतीच मी पाकिस्तानला जाऊन आले. माझे कुटुंब माझ्या बॉलिवूड पदार्पणामुळे आनंदी आहे. पाकिस्तानातील माझे चाहतेसुद्धा मला सपोर्ट करत आहे. तेथेदेखील मी माझ्या सिनेमाचे प्रमोशन केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रमोशनल इव्हेंटमध्ये क्लिक झालेले इमरान आणि हुमैमाचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स...