आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान सिरियल किसरच्या इमेजमधून बाहेर पडणार, आता ‘ठग’ बनून ठगवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सिरियल किसर म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इम्रान हाश्मी आता त्याच त्या भूमिकांना कंटाळला आहे. लवकरच तो ‘राजा नटवरलाल’ या चित्रपटातून रोमँटिक भूमिकेऐवजी चक्क ‘ठगा’च्या भूमिकेत दिसणार आहे. कुणाल देशमुख हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत.
या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘शातीर’ ठेवण्यात आले होते पण नावात आकर्षकता हवी असल्याने नंतर ‘राजा नटवरलाल’ असे नाव ठेवण्यात आले. इम्रानने आपल्या नेहमीच्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी रस्त्यावर राहणा-या या चित्रपटातील ठगाची भूमिका करणार आहे.
इम्रानसाठी ही अशा स्वरुपाची पहिलीच भूमिका आहे. राज 3, मर्डर 3, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, डर्टी पिक्चरसारख्या चित्रपटांमधून इम्रानने थोड्या वेगळ्या भूमिका केल्या असल्या तरी त्यातून त्याची किसर ही प्रतिमा पुसली गेली नव्हती. त्यामुळे त्याच त्याच सीन्सला कंटाळलेल्या इम्रानने आता थेट ठगाची भूमिका स्वीकारली आहे.
सध्या इम्रान महेश भट्ट यांच्या ‘मिस्टर एक्स’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच त्याचे ‘उंगली’ आणि ‘बत्तमीज’ चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आता ठगाची भूमिका साकारुन इम्रान आपली नवी प्रतिमा पडद्यावर साकारतो का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. इम्रानचा हा सिनेमा 29 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.