आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर विजेता अर्नेस्ट बॉर्गनिन यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्कर पुरस्कार विजेता अभिनेता अर्नेस्ट बॉर्गनिन यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. बॉर्गनिन यांना १९५५मध्ये आलेल्या 'मार्टी' या चित्रपटातल्या अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. शेवटच्या क्षणी त्यंची पत्नी आणि मुले त्यांच्याजवळ होती.

बॉर्गनिन यांचा 'द डर्टी डजन', 'आइस स्टेशन जेब्रा', 'मेकहेल्स नेवी', 'द वाईल्ड बंच' या चित्रपटातला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटांबरोबरच ९० च्या दशकातल्या 'द सिंगल आय' या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

बार्गनिन यांचे 'बास्केटबॉल' आणि 'गेटेका' हे अलिकडेच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत. बॉर्गनिन यांना गेल्यावर्षी १७ व्या स्क्रिन एक्टर्स गिल्डल अवॉर्ड्समध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हॉलिवूड एक्ट्रेस जेनिफर एनिस्टनची लगीनघाई
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीला जीवे मारण्याची धमकी
किम कार्डिशियन बनणार सर्वात महागडी हॉलिवूड सेलिब्रिटी