आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everyone Is Excited To Get A Glimpse Of Aishwarya

PICS: गोल्डन ड्रेसमध्ये दिल्लीत पोहोचली ऐश्वर्या, एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन रविवारी (23 मार्च) दिल्लीत एका ज्वेलरी शोरुमच्या लाँचिंगसाठी पोहोचली होती. यावेळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ऐश्वर्याची एक झलक बघण्यासाठी आतुर झाले होते.
ब्लॅक गोल्डन ड्रेसमध्ये पोहोचलेली ऐश्वर्या खूप सुंदर दिसली. यावेळी चाहत्यांचे प्रेम पाहून ऐश्वर्या आनंदी दिसली. तिने आपल्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले.
ब-याच काळानंतर ऐश्वर्या नवीन लूक आणि स्टाइलमध्ये दिसली. तसं पाहता ऐश्वर्याला यापूर्वीही कार्यक्रमात सहभागी होताना बघितले गेले. मात्र तिचा हा अंदाज यापूर्वी बघायला मिळाला नव्हता.
ऐश्वर्या ब-याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. 1997 मध्ये आलेल्या 'और प्यार हो गया' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या ऐश्वर्याला तिच्या चाहत्यांनी शेवटचे 'गुजारिश' या सिनेमात पाहिले होते. हा सिनेमा 2010 मध्ये रिलीज झाला होता. यादरम्यान तिचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. मात्र आता चार वर्षांनी ऐश्वर्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीला लागली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दिल्लीत ज्वेलरी शोरुमच्या लाँचिंगला पोहोचलेल्या ऐश्वर्याची खास झलक...