आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Photos Of Micta Award Function Held In Macau

मकाऊच्या बेटावर रंगला शानदार \'मिक्ता\' सोहळा, बघा EXCLUSIVE क्षणचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी नाटक आणि सिनेमाला सातासमुद्रापार घेऊन जाणारा यंदाचा ‘मिक्ता’चा सोहळा चीनचं विशेष बेट असलेल्या मकाऊमध्ये अलीकडेच पार पडला.
मकाऊ येथील व्हेनेटियन या पंचतारांकित हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये दिमाखात हा सोहळा रंगला. जणू मकाऊचं नभांगण मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या तारे-तारकांनी चमचमून गेलं होतं. या पुरस्काराच्या नेत्रदीपक सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. पुरस्कार आणि परफॉर्मन्सची रेलचेल येथे बघायला मिळाली.
भार्गवी चिरमुले, पल्लवी सुभाष. संजय नार्वेकर, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, प्रिया बापट, रेशम टिपनीस, वैभव तत्त्ववादी, निलेश साबळे, क्रांती रेडकर, भारती आचरेकर या कलाकारांनी आपल्या रॉकिंग परफॉर्मन्सने उपस्थितांची दाद मिळवली.
नृत्य, गीत, संगीत आणि संवादाची रुपेरी झालर असलेल्या हा नयनरम्य सोहळा लवकरच छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहे. मात्र त्यापूर्वी या सोहळ्याची EXCLUSIVE झलक आम्ही खास तुमच्यासाठी छायाचित्रांच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.
चला तर मग छायाचित्रांमधून मिक्ता सोहळ्याची खास झलक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...