(सिनेमाच्या सेटवरील सनीची छायाचित्रे)
मुंबईः सनील लिओनी सध्या
आपल्या आगामी 'एक पहेली लीला' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. बॉबी खान दिग्दर्शित या सिनेमाचे शूटिंग सध्या मुंबईतील फिल्मसिटीत सुरु आहे. या सिनेमातील काही दृश्यांसाठी 300 वर्षे जुन्या एका राजस्थानी मंदिराचा सेट उभा करण्यात आला आहे.
divyamarathi.comसोबत बोलताना बॉबी खान यांनी या सेटविषयी सविस्तर सांगितले. बॉबी म्हणाले, "आम्ही भैरों विर्जामन या प्राचीन मंदिराची फिल्मसिटीत प्रतिकृती तयार केली आहे. हा सेट सिनेमातील महत्त्वाचा भाग आहे. कारण सिनेमाची कहाणी येथून सुरु होते. शिवाय क्लायमॅक्सचे शूटिंगसुद्धा याच सेटवर केले जाणार आहे."
या सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल देवविषयीसुद्धा बॉबी खान यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, "राहुल या सिनेमा भैरोंची भूमिका साकारत आहे. तर सनी लंडनमध्ये राहणारी प्रसिद्ध मॉडेल आहे. जेव्हा ती एका फोटोशूटच्या निमित्ताने राजस्थानमध्ये येते, तेव्हा सिनेमाची खरी कहाणी सुरु होते. या सिनेमात सनी दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. लीला हे तिच्या पुनर्जन्मानंतरचे पात्र आहे."
फिल्मसिटीत दहा दिवसांचे शूटिंग पूर्ण झाले असून चार दिवसांचे शेवटच्या शेड्युलचे शूटिंग शिल्लक आहे. सिनेमात सनी लिओनी आणि राहुल देवसह जय भानूशाली महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. यावर्षी 10 एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फिल्मसिटीत बनवण्यात आलेल्या राजस्थानी मंदिराच्या सेटची आणि सनी लिओनीची एक्सक्लुझिव्ह छायाचित्रे...
सर्व छायाचित्रे - अजीत रेडेकर