आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EXCLUSIVE : Trailer Of New Marathi Movie Yellow Released

EXCLUSIVE:रितेश देखमुख निर्मित ‘यलो’ या सत्य घटनेवर आधारित सिनेमाचा ट्रेलर रिलीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बालक पालक’ या सुपरहिट सिनेमानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर ही जोडी पुन्हा एकदा मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आले असून ‘यलो’ असे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे.
एका सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा सकारात्मक भावनांची कथा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केलंय हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये याने... नुकताच या सिनेमा एक्सक्लूजीव ट्रेलर सोशल नेटवर्किंग साईट्सवर रिलीज झालाय.
‘बालक-पालक’ या आशयघन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर पुन्हा सिनेमा निर्मिती करणार नाही हे शक्यच नव्हतं. त्यानुसार ते आता पुन्हा एक अतिशय भावनिक आणि विलक्षण अशी कथा प्रेक्षकांसमोर ‘यलो’ या सिनेमाच्या माध्यमातून आणत आहेत.
उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषीकेश जोशी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर, प्रविण तरडे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहेत.
‘बालक-पालक’ या सिनेमाचे लेखक गणेश पंडीत आणि अंबर हडप यांनी ‘यलो’चे लेखन केले असून पटकथा महेश लिमये, गणेश पंडीत आणि अंबर हडप यांनी लिहिली आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची धुरा संगीतकार कौशल इनामदार यांच्यावर असून गीते गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत.
व्हिडिओवर क्लिक करा आणि बघा रितेश देशमुखची दुसरी निर्मिती असलेल्या आणि हटके शीर्षक असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरची खास झलक....