अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से आहेत, मात्र एक किस्सा असा आहे,
ज्याची चर्चा कदाचित कधीच शमणार नाही असे दिसते. तो किस्सा म्हणजे
बिग बी आणि रेखा यांचे एकेकाळी गाजलेले अफेअर. अलीकडेच या दोघांनीही
आपला वाढदिवस साजरा केला. 10 ऑक्टोबर रोजी रेखा यांनी वयाची 60वर्षे पूर्ण केली, तर 11 ऑक्टोबर रोजी बिग बी 72 वर्षांचे झाले.
1973 मध्ये झाले जयासोबत लग्नगाठीत अडकले बिग बी...
अमिताभ आणि जया यांचे लग्न झाल्यानंतर रेखा यांची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात झाली होती. लग्नाच्या काही वर्षांनी रेखा आणि बिग बींच्या लिंकअपच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. असे म्हटले जाते, की 1976 मध्ये 'दोन अनजाने' या सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ आणि रेखा यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.
कुंकू-मंगसुत्रात दिसल्या होत्या रेखा...
अमिताभ यांनी कधीही सार्वजनिकरित्या रेखासोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र रेखा या नात्यासाठी तयार होत्या. या दोघांच्या लिंकअपच्या बातम्यांनी तेव्हा जोर धरला, जेव्हा 1980 मध्ये ऋषी कपूर-नीतू सिंगच्या लग्नात रेखा कुंकू आणि मंगळसूत्र घालून दिसल्या होत्या.
1981 मध्ये यश चोप्रा यांनी जया-अमिताभ-रेखा यांच्या नात्यावर आधारित 'सिलसिला' हा सिनेमा तयार केला. या सिनेमात रेखा-अमिताभ शेवटच्या वेळी एकत्र दिसले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत हे दोघे कधीही ऑनस्क्रिन एकत्र दिसले नाहीत.
असो, रेखा आत्तादेखील कुंकू लावून अनेक ठिकाणी दिसतात. मात्र त्या कुणाच्या नावाचे कुंकू लावतात, याविषयी अद्याप रहस्य कायम आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बी टाऊनमधील अशाच आणखी काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सविषयी ज्याचे रुपांतर कधीही लग्नात होऊ शकले नाही...