आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकने उतरवली पूनम पांडेची \'नशा\', ट्विटर गर्लचे फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर आणि फेसबुकवर स्वतःचे हॉट फोटो अपलोड करुन प्रसिद्धीच्या झोतात राहार्‍या पूनम पांडेले मोठा झटका बसला आहे. फेसबुकने पूनम पांडेचे अकाउंट डिअ‍ॅक्टिव्ह केले आहे. ट्विटर गर्ल पूनमने याची माहिती ट्विट करुन दिली आहे.
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एकमेव चित्रपट करणारी आणि सोशल मीडियावर कायम चर्चेत राहाणारी पूनम फेसबुक अकाउंट रद्द झाल्याने त्रस्त झाली आहे. तिने ट्विटरवर लिहिले आहे, 'रिअली सेड... माझे अधिकृत फेसबुक पेज रद्द करण्यात आले आहे. त्यावर माझे 21 लाख फॅन्स होते. हे पेज मला परत कसे मिळेल याची माहिती ट्विटरवरील मित्रांनी द्यावी.'
फेसबुक का करते अकाउंट डिअ‍ॅक्टिव्ह
सर्वसामान्यपणे बनावट किंवा खोट्या नावाने अकाउंट सुरु करण्यात आले तर फेसबुक त्याला डिअ‍ॅक्टिव्ह करते. तसेच, अधिकाधिक ग्रुपशी जोडले गेले तर. अधिक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या तर. मार्केटिंगच्या उद्देशाने पेजचा वापर केला तर. याशिवाय चिथावणीखोर आणि भडकाऊ कंटेंट शेअर केला तर फेसबुक असे अकाउंट रद्द करते. त्यामुळे या सर्व कारणांवरुन लक्षात येऊ शकते की पूनमचे अकांउट का रद्द केले गेले असेल.
विशेष म्हणजे, पूनमने फेसबुकवर अनेक उत्तेजक फोटो आणि मॅसेज पोस्ट केल्या होत्या. तिने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केलेला आहे. सोशल नेटवर्किंग साइटमुळे पूनम प्रसिद्धीस आलेली आहे. तिचे फेसबुक अकाउंट बंद झाल्याने ती त्रस्त आहे. जर, ट्विटरने देखील असेच पाऊल उचलेल तर, पुनम काय करेल ?