आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक चाहत्यांना सलमान देतोय नोकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बीइंग ह्यूमन' संस्थेच्या माध्यमातून सलमान खान अद्याप वैद्यकिय आणि शिक्षण क्षेत्रासाठी मदत करत होता. आता तो रोजगारच्या क्षेत्रातसुध्दा लोकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. मागील आठवड्यात त्याने फेसबुक पेजला जोडलेल्या चार चाहत्यांना नोकरी दिली आहे. सलमान ज्या ब्रँड्ससोबत जोडलेला आहे त्यांना आपल्या फेसबुक पेजव्दारा लोकांना भरती करण्यास सांगितले आहे. याची सुरूवात त्याच्या आणि 'थम्स अप'च्या 'वीर प्रोजेक्ट'ने झाली आहे. त्याव्दारे हजारापेक्षा अधिक अपंग आणि शरीराने असक्षम असलेल्या लोकांना रोजगार देण्यात आले आहे.
त्यानंतर त्याने घोषणा केली, की त्याच्या 'बीइंग ह्यूमन' स्टोअरमध्ये एका अपंग व्यक्तीला रोजगार दिला जाईल. यावर्षी सलमान आणखी 40 'बीइंग ह्यूमन' स्टोअर चालू करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी त्याच्या 'बीइंग ह्यूमन'च्या साखळीला 300 कोटींचा नफा झाला असून सलमानने त्याचात आपला कोणताही वाटा ठेवलेला नाही. लवकरच या ब्रँडपासून देशभरात कॅफे आणि जिम चालू केले जाणार आहेत.
याविषयी सलमान काय म्हणतो?
'बीइंग ह्यूमन' केवळ काही दिवसांसाठी नाहीये. ही संस्था सतत लोकांना आधार देऊ शकते. म्हणून मी संस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिले पाऊल या संस्थेची आर्थिक बाजू मजबूत करण्याचे आहे. त्यामुळे मी या संस्थेचा एकही पैसा स्वत: जवळ ठेवत नाही. नफ्याची रक्कम संस्थेसाठीच खर्च केली जात आहे. त्यामधून आम्ही जास्तीत-जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.'