आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Anniv: हिंदी सिनेसृष्टीचे पहिले \'अँटी हिरो\' होते अशोक कुमार, जाणून घ्या त्यांच्या आयुष्याविषयी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीत कुमुद कुमार गांगुली नावाच्या व्यक्तीला लोक ओळख नसले तरी अशओक कुमार आणि दादा मुनी नावाच्या जेष्ठ अभिनेत्याला लोक ओळखतात. अशोक कुमार यांचेच नाव कुमुद कुमार गांगुली होते. 80 आणि 90च्या दशकात सिगारेट ओढणारे आणि नेहमी चेह-यावर स्मित हास्य हसलेल्या व्यक्तीच्या पात्राला प्रेक्षक खास पसंत करायला लागले होते.
आज अशोक कुमार यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे, त्याची आज (10 डिसेंबर) पुण्यातिथी आहे. 10 डिसेंबर 2001मध्ये अशोक कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.
अशोक कुमार यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911 रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. वकील कुंजलाल गांगुली यांचा मोठा मुलगा अशोक कुमार पुढे एक अभिनेते बनले. तेआपले छोटा भाऊ अनूप कुमार आणि किशोर कुमार यांच्यासाठी एक प्रेरणा बनले.
चलती का नाम गाडी-
प्रसिध्द पार्श्वगायक किशोर कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांनी अभिनयासह गायनाची प्रेरणादेखील आपले मोठे भाऊ अशोक कुमार यांच्याकडून घेतली होती. कारण बालपणीपासूनच अशोक यांनी किशोर यांना गायनाचे धडे दिले होते. तिन्ही भावांनी 'चलती का नाम गाडी' सिनेमात एकत्र काम केले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता.
अशोक कुमार यांना सुपरहिट अभिनेता नव्हे एक हिट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न होते. 1934मध्ये अशोक कुमार यांनी मुंबईच्या न्यू थिएटरमध्ये लॅबोरेटरी सहायक म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे भावोजी आणि मित्र शशिधर मुखर्जी यांनी त्यांना बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी बोलावले. त्यानंतर या स्टुडिमध्ये काम करत असताना 1936मध्ये 'जीवन नैया' मधून अशोक कुमार यांनी अभिनेता म्हणून फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमातील मुख्य नायक नज्म उल हसन अचानक आजारी पडल्याने अशोक कुमार यांना या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर 'कंगन', 'बंधन' आणि 'झूला' सिनेमांतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली. असे करत अभिनेता म्हणून अशोक कुमार
फिल्मी इंडस्ट्रीमध्ये स्थापित झाले.
एका अभिनेता म्हणून अशोक कुमार यांनी स्वत:ची खास शैली विकसित केली. त्यांनी अभिनयात विविध प्रयोग केले आणि पहिल्यांदा हिंदी सिनेमांमध्ये अँटी हिरोचे पात्राचा ट्रेंड त्यांनी सुरु केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशोक कुमार यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच काही....