आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांचे जावई होते देवेन वर्मा, जाणून घ्या त्यांचा अल्पपरिचय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फोटो- देवेन वर्मा पत्नी रुपा गांगुलीसोबत( रुपा गांगुली दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांच्या कन्या आहेत)]
आपल्या विनोदी शैलीने लोकांना हसवणा-या प्रसिध्द विनोदवीर देवेन वर्मा यांचे आज रात्री 2च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1937 रोजी झाला होता. त्यांनी केवळ अभिनयच नव्हे दिग्दर्शकाच्या रुपातदेखील लोकांना हसवले. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्याच्या नौवरसे वाडिया कॉलेजमधून पूर्ण केले.
साठच्या दशकात अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते मुंबईला रवाना झाले. 1961मध्ये यश चोप्रा दिग्दर्शित 'धर्म पुत्र' सिनेमातून त्यांनी अभिनय करिअरला सुरुवात केली होती.
सिनेमा हिट तर झाला मात्र देवेन प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करण्यास अपयशी ठरले. 1963मध्ये देवेन वर्मा यांना बी. आर चोप्रा यांच्या 'गुमराह'मध्ये काम करण्याची संधी मिळाली परंतु या सिनेमातूनसुध्दा त्यांना खास फायदा झाला नाही. 1966 हे वर्ष देवेन वर्मा यांच्या करिअरसाठी महत्वाचे ठरले.
विशेष म्हणजे देवेन वर्मा यांनी मराठी सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप पाडली. 'दोस्त असावा तर असा' या मराठी सिनेमात ते झळकले होते.
या पॅकेजच्या माध्यमातून देवेन वर्मा यांच्या खासगी आणि फिल्मी करिअरविषयी जाणून घेऊया.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या देवेन वर्मा यांच्या फिल्मी करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल...